गुहागरचा गणपती

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्‍यात गुहागर हे गाव आहे. येथे छोटेशे गणेश मंदिर आहे. मंदिरातील गणेशमूर्ती कोळी लोकांना समुद्रात सापडल्याचे सांग‍ितले जाते. संकट निवारण करण्‍यासाठी ग्रामस्थ या गणरायावर साकडं टाकत असतात. एकदा समुद्राच्या पाणी गुहागर गावात शिरले होते. तेव्हा संपूर्ण गाव बुडण्याची वेळ आली होती. तेव्हा गावातील लोकांनी गणपतीची प्रार्थना केली. तेव्हा पूर्वाभिमुख असलेली ही मूर्ती पश्‍चिमाभिमुख झाली आणि समुद्र पाणी उतरले होते. अशी या गणपतीसंदर्भात आख्यायिका आहे. मंदिर सुमारे 300 वर्ष पुरातन आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती