हापूस आंबा हा फक्त कोकणचाच, हापूसला स्वतंत्र पेटंट

शुक्रवार, 20 एप्रिल 2018 (10:17 IST)
हापूस हा फक्त कोकणचाच… यावर मुंबईतील इंडियन पेटंट कार्यालयातील सुनावणीत शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आता गुजरात, कर्नाटक किंवा मद्रासच्या आंब्याला हापूस नाव लावता येणार नाही. जगभरात केवळ कोकणच्या हापूसचाच दबदबा असेल. याशिवाय देवगड आणि रत्नागिरीच्या हापूसचे अस्तित्वही अबाधित राहाणार आहे. हापूसला स्वतंत्र पेटंट देण्यात आले.
 

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राबाहेरूनही आंबा विक्रीसाठी येत होता. हापूस म्हणून या आंब्यांची सर्रास विक्री होत होती. एप्रिल २०१७ मध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या हापूसला पेटंट मिळाले. त्यानंतर हापूसच्या पेटंटबद्दलचा वाद निर्माण झाला. गुजरात, कर्नाटक, मद्रास आणि महाराष्ट्राकडून हापूसच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला. त्यावर मुंबईतील इंडियन पेटंट कार्यालयात सुनावणी झाली. या सुनावणीत हापूस आंबा हा कोकणचाच असून इतर राज्यांतून आलेल्या आंब्यांना हापूस हे नाव मिरवता येणार नाही असा निर्णय देण्यात आला, अशी माहिती पेटंट आणि जीआय (जीऑग्राफिकल इंडिकेशन) तज्ञ प्रा. गणेश हिंगमिरे यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती