सोलकढी हे कोकम आणि नारळाच्या दूधाचे मिश्रण असते. त्यामुळे कोकम आणि नारळामधील आरोग्यदायी गुणधर्म स्वास्थ्य सुधारण्यास फायदेशीर ठरतात. कोकमामध्ये अॅन्टीऑक्सिडंट, डाएटरी फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम घटक मुबलक असतात. त्याचसोबत कॅलरी वाढवणारे, अनावश्यक फॅट्स किंवा कोलेस्ट्रेरॉल वाढण्याचा धोका कमी असतो.
सोलकढीमध्ये आलं-लसणाची फोडणी असल्याने सर्दी, मळमळ, पचनक्रियेत बिघाड झाल्याने वाढणारी अस्वस्थता कमी करून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.