अस्सल मराठमोळी फोडणीची खिचडी आणि कढी ही एकदम घरगुती, साधी पण जबरदस्त चवीची जोडी आहे.
अस्सल फोडणीची खिचडी
साहित्य-
तांदूळ - १ वाटी
मुगाची डाळ किंवा तूर डाळ - १/२ वाटी
कांदा - १ मोठा बारीक चिरलेला
टोमॅटो - १ चिरलेला
बटाटस - १ क्यूब्स
हिरवी मिरची - २-३
आले-लसूण पेस्ट - १ चमचा
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - १-१.५ चमचा
धणे पूड - १ चमचा
जिरे पूड - १/२ चमचा
मीठ चवीनुसार
तेल/तूप - २-३ चमचे
कृती-
सर्वात आधी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन १५-२० मिनिटे भिजवून ठेवा. आता कुकरमध्ये तेल/तूप गरम करा. मोहरी, जीरे, हिंग, कडीपत्ता, लाल मिरची टाकून फोडणी द्या. कांदा घाला, सोनेरी होईपर्यंत परतवा. आता आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, टोमॅटो घालून २ मिनिटे परतवा. हळद, तिखट, धणे-जिरे पूड, मीठ घाला. मग भिजवलेली डाळ-तांदूळ आणि बटाटस घालून २ मिनिटे परतवा. तसेच पाणी घाला खिचडी थोडी मऊ हवी तर जास्त पाण घाला आता ३-४ शिट्ट्या द्या. शिट्ट्या थांबल्यावर उघडून नीट ढवळा. गरमागरम तूप घालून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
कृती-
सर्वात आधी बेसन पाण्यात किंवा थोड्या ताकात भिजवून गुठळ्या नसतील याची काळजी घ्या. आता एका भांड्यात ताक घ्या, त्यात बेसन मिश्रण, हळद, मीठ, साखर मिसळा. नीट फेटून घ्या.
एका पॅनमध्ये तूप गरम करा. मोहरी, जीरे, हिंग, कडीपत्ता, लाल मिरची, हिरवी मिरची टाकून फोडणी द्या. तसेच आले-लसूण पेस्ट घालून १ मिनिट परतवा. तयार केलेले ताक मिश्रण हळूहळू घाला. सतत ढवळत राहा जेणेकरून फाटणार नाही. उकळी आल्यावर ४-५ मिनिटे कमी आचेवर शिजवा. चव चेक करा.
शेवटी भरपूर कोथिंबीर टाकून गॅस बंद करा. गरमागरम फोडणीची खिचडी प्लेटमध्ये घ्या, त्यावर भरपूर तूप ओता, बाजूला कढी, पापड, लिंबू आणि कोथिंबीर टाकून नक्कीच खा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.