पुणे ते श्री क्षेत्र पंढरपूरला जातांना या धार्मिक स्थळांना नक्की भेट द्या

शुक्रवार, 4 जुलै 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : आषाढी एकादशी निमित्त अनेक भक्त पंढरपूर येथे जातात. व विठुरायाचे दर्शन घेतात. पण महाराष्ट्रात अनेक असे धार्मिक पर्यटस्थळे आहे. जिथे हजारो भक्त भेट देत असतात. तुम्ही देखील या ठिकणी अवश्य भेट देऊ शकतात. आज पाहणार आहोत पुण्याहून निघाल्यानंतर पंढरपूरला जातांना आपण कोणत्या धार्मिक स्थळी भेट देऊ शकतो. तुम्ही जर पुण्यावरून पंढरपूरकडे जाण्यासाठी विचार करत असाल तर या धार्मिकस्थळी भेट नक्कीच द्या. 
ALSO READ: श्री क्षेत्र पंढरपूर मधील या प्रेक्षणीय स्थळांना नक्की भेट द्या
मल्हारी मार्तंड खंडोबाची जेजुरी
महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात असलेले जेजुरी हे तीर्थक्षेत्र असून हे मल्हारी मार्तंण्डला समर्पित आहे. अनेक भक्तांचे कुलदैवत असलेले मल्हारी मार्तंड हे साक्षात भगवान शंकरांचे अवतार मानले जातात. मल्हारी मार्तंडला भक्त प्रेमाने, श्रद्धेने खंडोबा असे देखील म्हणातात. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून खंडोबाची नगरी जेजुरीला सोन्याची जेजुरी देखील संबोधले जाते. पिवळ्या धमक रंगाने न्हालेली मार्तंडाची जेजुरी सोन्याची भासते. येथे भाविक लोक हळद-बुक्का उधळतात. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा गजर करतात. खंडोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. लाखो भक्तीचे श्रद्धास्थान असलेली हे स्थळ पुरंदर तालुक्यात आहे.
 
संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ आळंदी 
पुणे जिल्ह्यात संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. याला देवाची आळंदी असेही म्हणतात. पुण्यापासून आळंदी अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी भक्तांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत संजीवन समाधी घेतली. त्यानंतर १५४० मध्ये भव्य समाधी मंदिर बांधण्यात आले.शिवाय येथे विठ्ठल रखुमाई, राम, कृष्ण, मुक्ताई यांची मंदिरेही येथे आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. आषाढात येथून ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते. आळंदी ते पंढरपूर हे अंतर दीडशे किलोमीटर आहे.  
 
संतश्रेष्ठ सोपानदेव महाराज समाधी सासवड 
पुणे जिल्ह्यात सासवड हे तीर्थक्षेत्र असून पुण्यापासून हे ३० किमी अंतरावर आहे. संत ज्ञानेश्वरांचे बंधू संतश्रेष्ठ सोपानदेव यांनी सासवड येथे मार्गशीर्ष महिन्यात संजीवन समाधी घेतली. तसेच सासवड हे संत सोपानदेव यांचे समाधिस्थान आहे. सासवड हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यात असून याठिकाणी संतश्रेष्ठ सोपानदेव यांचे समाधी मंदिर आहे. तसेच मंदिर परिसरात वटेश्वर, संगमेश्वर असे प्राचीन शिवमंदिरे देखील आहे. तसेच पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे समाधीस्थान देखील येथे आहे.  
ALSO READ: आषाढी एकादशीला पंढरपूर जाणे शक्य नसेल तर या मंदिरात दर्शन घ्या
संत तुकाराम महाराज मंदिर श्री तीर्थक्षेत्र देहू
श्री तीर्थक्षेत्र देहू हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वसलेले एक गाव आहे. तसेच विठ्ठलाचे परम भक्त संत तुकाराम महाराज यांचे देहू हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार संत तुकाराम महाराज या गावातूनच वैकुंठाला गेले होते. देहू मधील इंद्रायणी नदी देखील तुम्ही पाहू शकतात. हीच ती इंद्रायणी नदी आहे जिने तुकोबांची गाथा परत केली होती. तसेच देहू गावात तुम्ही वृंदावन, विट्ठल मंदिर, चोखामेळा मंदिर  हे देखील धार्मिक ठिकाणे पाहू शकतात.  
 
श्रीनाथ म्हस्कोबा माळशिरस 
पुणे जिल्ह्यातील तालुका पुरंदर येथील वीर गावातील काशी काळखंडाचा राजा काळभैरव म्हणजेच श्रीनाथ म्हस्कोबाचे जागृत देवस्थान आहे. तसेच फार पूर्वी येथे स्मशानभूमी होती म्हणून या देवाचे नाव श्रीनाथ म्हस्कोबा पडल्याचे सांगितले जाते. हे मंदिर पूर्णगंगेच्या तीरावर उभारलेले असून पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर सुंदर असून याचे बांधकाम काळ्या दगडात आहे. तसेच मंदिराची रचना देऊळवाडा प्रकारातील असून त्याच्या चारही बाजूंनी उंच तटबंदी आहे. तसेच पादुकामंदिर आणि मुख्य मंदिर याच्यामध्ये भव्य दगडी कासव आहे. या कासवावर उभे राहून नवस बोलल्यावर तो पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच मंदिरपरिसरात मोठी घंटा आहे. मंदिरात आत गेल्यानंतर डाव्या बाजूला श्रीनाथांचे वाहन चिंतामणी नावाच्या अश्वाची भव्य मूर्ती आहे.  
 
संत दामाजीपंत समाधी मंगळवेढा 
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा एक प्रसिद्ध ठिकाण आहे जिथे संत मंडळींपैकी एक संत म्हणजे संत दामाजीपंत यांची समाधी आहे संत दामाजीपंत हे मंगळवेढा येथील महान संत होते. संत दामाजीपंत यांचा कार्यकाळ १३०० ते १३८२ एवढा आहे. सेच पंतांची समाधी अगदी साध्या रूपात  होती. मग छत्रपतींचा पूत्र राजाराम यांनी  घुमटवजा येथे मंदिर उभारले. व या सुंदर मंदिरात विठ्ठल रुखमाई आणि दामाजीपंत यांची मूर्ती स्थापन केली. मंगळवेढा मध्ये भौगोलिक विविधता आढळते. तसेच या ठिकाणी ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच मंगळवेढा तालुका हा ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे.
 
सिद्धेश्वर मंदिर सोलापूर
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात श्री सिद्धेश्वर मंदिर आहे व हे मंदिर बाराव्या शतकातील शिवभक्त आणि लिंगायत धर्मातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे तसेच हे मंदिर संगमरवरी समाधी मंदिराच्या मध्यभागी आहे. तसेच या ठिकाणी या मंदिराला पवित्र मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. सिद्धेश्वर हे सोलापूरचे ग्रामदेवता आहे. हे मंदिर सोपलापूर जिल्ह्यातील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक असून सुंदर तलावाने वेढलेल्या बेटावर स्थापित आहे. श्री सिद्धेश्वर मंदिर शांततापूर्ण आणि आध्यात्मिक अनुभव देते. मंदिराची वास्तुकला अद्भुत असून पर्यटकांना आकर्षित करते.  
 
श्री भगवंत मंदिर बार्शी
सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी हे एक धार्मिक क्षेत्र असून येथे प्रसिद्ध श्री भगवंत मंदिर आहे तसेच येथे बारा शिवमंदिरे असल्याचा उल्लेखही पुराणात आढळत असल्याने त्यावरून बार्शी असं नाव प्रचलित आहे. तसेच येथील वैशिष्ठे म्हणजे भगवंत कोणत्याही नामाभिधानाशिवाय इथं स्वयंभू स्थापित आहे. तसेच भगवान श्री विष्णू लक्ष्मीसह येथे वास्तव्य करतात याकरिता याला हे भगवंताचं मंदिर म्हणून ओळखले जाते या मंदिराला पेशवेकालीन इतिहास लाभला असून आषाढी, कार्तिकी एकादशीला या मंदिरात भक्तांची एकच गर्दी पाहावयास मिळते तसेच पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचे हे महत्वाचं ठिकाण असून मंदिरात दररोज काकडा आरती, महापूजा केली जाते 
 
तुळजाभवानी मंदिर तुळजापूर 
तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तसेच बालाघाट पर्वतरांगेत हे ठिकाण आहे. मंदिर परिसरात सर्वत्र चिंचेची झाडे असल्याने या परिसराचे मूळ नाव चिंचपूर होते. कालांतराने श्री तुळजा भवानी मातेच्या वास्तव्यामुळे त्याचे नाव तुळजापुर झाले. देदेशभरातून दरवर्षी लाखो भाविक येथे भेट देतात. मंदिरात दररोज पहाटे चारच्या सुमारास चौघड्याच्या निनादाने पुजेस प्रारंभ होतो. तसेच मंदिरात प्रवेशासाठी राजा शहाजी व राजमाता जिजाऊ यांच्या नावे दोन द्वारे आहे. मुख्य दाराच्या पहिल्या माळ्यावर श्री संत ज्ञानेश्वर धार्मिक ग्रंथालय व श्री संत तुकाराम धार्मिक ग्रंथालय आहे. ग्रंथालयांना लागूनच श्री समर्थ विशेष हे विश्रामगृहही आहे. तुळजापूर नजीक पंढरपूर व अक्कलकोट ही महाराष्ट्रातील दोन प्रमुख तीथेक्षत्रे आहे. 
 
श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट  
श्री स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दत्त संप्रदायातील थोर संत होऊन गेले. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रय हे तीसरे पूर्णावतार आहे. अशी आख्यायिका आहे. गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलमजवळील कर्दळीवनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. इ.स. 1856 साली स्वामीने अक्कलकोट मध्ये अवतरले त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी अनेक मान्यवरांना मार्गर्शन दिले. स्वामींनी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. स्वामींचे शिष्य चोळप्पा यांचा घरा जवळ यांची समाधी करण्यात आली. स्वामी समर्थ कर्दळीवनात परतले. 
ALSO READ: पंढरपूरसारखे विठ्ठल मंदिर बुंदेलखंडात

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती