कोकणचे नैसर्गिक सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करते. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले हे सुंदर क्षेत्र पर्वत, समुद्रकिनारे, धबधबे आणि पारंपारिक गावांमुळे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. निसर्गाच्या सौंदर्याव्यतिरिक्त, येथे तुम्हाला कोकणी संस्कृती, खाद्यपदार्थ आणि लोक परंपरा देखील पाहायला मिळतील. पावसाळ्यात कोकणातील सुंदर ठिकाणे तुम्ही नक्कीच एक्सप्लोर करू शकतात.
रत्नागिरी
आंबा आणि समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले रत्नागिरी हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. येथे इतिहास, निसर्ग आणि संस्कृतीचा संगम पाहायला मिळतो. आठवड्याच्या शेवटी तुम्ही कुटुंबासह हे खास ठिकाण एक्सप्लोर करू शकता.