* पंचामृताने गणपतीला स्नान घालावे नंतर चंदन, अक्षता, दूर्वा अर्पित करून कापूर जाळून पूजा आणि आरती करावी. गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. लाल रंगाचं फुलं अर्पित करावं.
* आता एका सुती दोरा घ्यावा. याला सात गाठी बांधाव्या आणि बाप्पाच्या चरणी ठेवून द्यावे. विसर्जनापूर्वी तो दोरा आपल्या पर्समध्ये ठेवावा. या उपायाने धन, संपत्ती, सुख, समृद्धी, यश, वैभव, संपन्नता, सौभाग्य, ऐश्वर्य आणि कीर्ती प्राप्त होते. विषम परिस्थितीत देखील रक्षा करण्याचे सामर्थ्य यात असतं.