पुढच्या वर्षी लवकर येणार, बाप्पा पुढच्या वर्षी जास्त दिवस थांबणार

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा भक्तीपूर्ण वातावरणात आपल्या लाडक्या गणरायाला आपण  निरोप देत  आहोत,  सोबतच  पुढच्या वर्षी लवकर या असे सांगतो आहोत. त्यात आता पुढच्या वर्षी लवकर या म्हणणाऱ्या प्रत्येक गणेशभक्ताची  हाक गणपती बाप्पाने ऐकली आहे. कारण खरोखरचं, 2020 मध्ये गणपती बाप्पा 11 दिवस लवकर येणार आहेत.
 
पुढच्या वर्षी गणपती बाप्पा 22 ऑगस्ट 2020 मध्ये विराजमान होणार आहेत अशी माहिती अनेक पंचांगकर्त्यांनी दिली आहे. पंचांगकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या वर्षी 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. तर 1 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.
 
त्याशिवाय बुधवारी 31 ऑगस्ट 2022, मंगळवार 19 सप्टेंबर 2023, शनिवार 7 सप्टेंबर 2024, बुधवार 27 ऑगस्ट 2025 या पुढील 5 वर्षांच्या बाप्पाच्या आगमनाच्या तारखा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती