या प्रकारे अर्पित कराव्या दुर्वा
दुर्वा कोवळ्या असाव्यात.
दुर्वाना ३, ५, ७ अशा विषम संख्यांच्या पात्या असाव्यात.
चेहरा सोडून सर्व गणपती दुर्वानी मढवावे.
दुर्वाचा वास महत्त्वाचा आहे म्हणून दुर्वा दिवसातून दोन ते तीन वेळा बदलाव्या.
लाल वस्तू
गणपती वर्ण लाल. म्हणून लाल फुलं, तांबडे वस्त्र, रक्तचंदन वापरतात. लाल रंग वातावरणातील पवित्रके मूर्तीकडे जास्त आकृष्ट होतात. मूर्ती जागृत व्हावयास मदत होते. गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले अर्पण करावे.
मोदक
२१ दुर्वाप्रमाणे २१ मोदकांचा नैवेद्य दाखवतात. मोदक म्हणजे आनंद. आनंदप्रदान करणारी शक्ती. मोदक ज्ञानाचे प्रतीक आहे. मोदकाच्या टोकाप्रमाणे आपले ज्ञानसुद्धा थोडे आहे असे वाटते पण अभ्यास करू लागल्यावर समजते की खूप मोठे आहे. मोदक गोड तसाच ज्ञानाचा आनंदही गोड असतो. हातात मोदक म्हणजे आनंद प्राप्त करण्याची शक्ती. म्हणून याला ज्ञानमोदक देखील म्हणतात.