गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे-अमित शाह

सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (14:30 IST)
भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह रविवारी रात्री मुंबईत पोहोचले. आज ते लालबागच्या गणपतीचे आणि नंतर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात गणरायाचे दर्शन घेतील. तेथून अमित शाह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यातील गणरायाचे दर्शन घेतील आणि मेघदूत बंगल्यात भाजपा प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करतील.
 
अमित शाह सध्या सह्याद्री अतिथीगृहावर आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. तसेच  अमित शाह लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी रवाना होणार आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे. आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईन. शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाइक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाइक विद्यालयाचे उद्घाटन होईल, असं अमित शाह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती