मुंबईत उकाडा वाढला, मराठवाडा आणि विदर्भात मात्र पाऊस

रविवार, 4 सप्टेंबर 2022 (10:37 IST)
मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून उकाडा सुरू असल्याने नागरिक हैराण झालेत. आतापासूनच ऑक्टोबर हीटची झळ बसत असल्याची प्रतिक्रिया मुंबईकर देतायत. पण केवळ मुंबईच नाही तर संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा कमाल तापमानात मोठा फरक जाणवत आहेत. ही परिस्थिती पुढील सात दिवस कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
राज्यात पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव असून यामुळे तापमानात वाढ झाल्याचं प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. पावसाळापूर्वी जाणवणारी उष्णता आणि आर्द्रता मुंबईत जाणवत आहे.
 
अरबी समुद्रात पश्चिमेकडून वाहणारे वारे कमी झाले असून पावसाळी वारे कमकुवत होतात, तेव्हा तापमानात वाढ दिसू लागते असंही हवामान विभागाने सांगितलं आहे.
 
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती