मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेत गणपतीचेही दर्शन घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे. याशिवाय शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच शाह हे मुंबई दौऱ्यावर असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबईचं अध्यक्षपद आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलं आहे. आगामी महापालिका निवडणूक, वार्डरचना आणि कॅबिनेट विस्तारावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता शाह मुंबई दौऱ्यात बीएमसी निवडणुकीसाठी काय रणनिती आखणार किंवा त्यासाठी भाजप नेत्यांना कोणता कानमंत्र देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.