ठरलं, अमित शहा येत्या 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार

गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 (21:51 IST)
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा येत्या 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते लालबागचा राजा सिद्धिविनायक या प्रमुख गणपतींचे दर्शन घेणार आहेत. याच दौऱ्यात अमित शहांच्या उपस्थितीत भाजप मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मुंबई दौऱ्यावर असताना अमित शाह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी अमित शाहांच्या नेतृत्वात बैठक घेतली जाणार आहे.
 
अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात प्रथम लालबाग आणि सिद्धीविनायकाचे दर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर  अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेवरील विजयासाठी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
 
यामध्ये BMC भाजपच्या हाती येण्यासाठी शहांच्या नेतृत्त्वाखाली बैठक घेतली जाणार आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी भाजपकडून विशेष रणनिती आखली जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती