जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे आरोग्य उत्तम नसेल तर त्याला नेहमी उत्तर दिशेकडे डोक ठेवून झोपायला पाहिजे. पोटाच्या रोगाने त्रस्त असेल तर झोपताना उशी घेऊ नये. लाल आणि काळ्या रंगांच्या चादरीवर झोपणे टाळावे, हे रंग आरोग्यास हानी पोहोचवतात.
ज्या खोलीच्या वर टॉयलेट किंवा बाथरूम असेल तर त्या खोलीत देखील नाही झोपायला पाहिजे. घरातील ज्या खोलीचे दार जिन्याकडे उघडतात, त्या खोलीत देखील झोपणे टाळायला पाहिजे. फेंगशुईत असे मानले जाते की त्या खोलीत नाकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो.
घरात प्रवेश करताना चपला, जोडे बाहेर काढायला पाहिजे. फेंगशुईत बोनसाई आणि कॅक्टसला हानिकारक मानले जाते. चुकूनही यांना घरात नाही ठेवायला पाहिजे. फेंगशुईत कासवाला शुभ मानले जाते. याला घरात ठेवल्याने घरात आनंद येतो.