अनेक लोक उंदीर मारण्यासाठी औषधे वापरतात परंतु औषधांचा वापर कुटुंबातील लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो म्हणून औषधाविना घरगुती वस्तू उंदीर पळवण्यासाठी काही सोपे उपाय जाणून घ्या:
कांदा
उंदीर कांद्याचा तीक्ष्ण वास सहन करू शकत नाही. उंदीर फिरत असेल त्या ठिकाणी कांद्याचे लहान-लहान तुकडे ठेवावे. या वासामुळे उंदीर पळ काढेल.
केस
केसांचा गुंता उंदराच्या बिळाजवळ ठेवावा. उंदीर हे खाऊन मृत्यू पावतात.
शेण
उंदराच्या बिळाजवळ शेण ठेवावे. शेण खाऊन उंदीर मरून जाईल.
तमालपत्र
उंदीर तमालपत्राच्या गोड वासाने खेचले जातात, परिणामस्वरूप ते तमालपत्र खातात आणि उंदरांसाठी यात असलेले विषारी तत्त्वामुळे मरतात.
पुदीना
ज्या जागेतून उंदीर घरात प्रवेश करत असेल तिथे पुदीन्याच्या तेलात कापसाचा बोळा पिळून ठेवावा. वासामुळे उंदीर आत येणार नाही.
काळी मिरी
काळी मिरी पावडर पाण्यात मिसळून बिळाजवळ शिंपडा. या वासामुळे उंदीर पळ काढतील.