Father's Day Wishes In Marathi जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा

मंगळवार, 15 जून 2021 (09:57 IST)
आई बाळाला ९ महिने पोटात सांभाळते
तर बाप बाळाला आयुष्यभर डोक्यात सांभाळतो
जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!
 
चट्का बसला, ठेच लगली,
फटका सला तर
"आई ग...!"
हा शब्द बाहेर पडतो, पण
रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ
येऊन ब्रेक दाबतो तेव्हा
"बाप रे!"
हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आई चालते पण मोठ्मोठी वादळ
पेलताना बापच आठवतो.
 
"बाप बाप असतो
...तो काही शाप नसतो....
तो आतून कँनव्हास असतो.
.मुलासाठी राब-राब राबतो.
बुडणार्या सुर्याकडे उगाच पाहत बसतो
पायाच्या नखानी माती उकरत असतो.
शेवटी सर्वानीच साथ सोडली असते
पाखरं घर सोडून दुर निघुन गेलेली असतात.
बाप मात्र आपल्या पाखराची वाट पाहतो.
 
तुमच्यासारखा बाबा या जगात शोधूनही सापडणार नाही. 
मला कायम साथ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
प्रत्येक मुलगी तिच्या पतीची राणी असू शकते
परंतु तिच्या वडिलांची ती राजकुमारीच असते
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
मी कधी बोलले नाही, सांगितले नाही तरीही बाबा 
तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट बाबा आहात
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…
जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!
 
स्वप्नं तर माझी, पण ती साकारण्याची ताकद दिली तुम्ही
खंबीरपणे उभे राहिलात माझ्या पाठिशी, तुमच्याही पाठिशी मी असाच राहीन खंबीरपणे उभा
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा
 
माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे
मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती