1 धूम्रपान आणि मद्यपान सोडा-आपण वडील म्हणून आपल्या मुलांवर अधिक प्रभाव पाडता आणि आपल्या सवयी देखील मुलांवर प्रभाव पाडतात.मुलं फक्त आईच्या सवयीचे अनुसरण करत नाही तर वडिलांच्या सवयीचे अनुसरण देखील करतात.तसेच धूम्रपान आणि मद्यपान केल्याने आरोग्यावर देखील दुष्प्रभाव पडतो. ज्याचा परिणाम भविष्यात जाऊन आपल्या कुटुंबाला भोगावा लागतो.
2 आळस सोडा आणि नियमित व्यायामाचा अवलंब करा- आळस सोडून आपण नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. या मुळे आपण केवळ तंदुरुस्त होणार नाही, परंतु आपली मुले लहान पणापासूनच व्यायाम करायला शिकतील, जेणेकरून पुढे जाऊन ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील तंदुरुस्त राहतील आणि आरोग्याच्या समस्यांपासून दूर राहतील.
3 अयोग्य आहार घेणे बंद करा-वडील बनण्यापूर्वी आपण कोणत्या प्रकारचे आहार घेत होता , लग्नानंतर आपला आहार काय होता आणि वडील बनताना आपल्या आहाराचा आपल्या मुलाच्या जन्माच्यावेळेस मुलाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. जेव्हा आपली पत्नी गर्भधारण करते तेव्हा आपल्या आणि आपल्या पत्नीच्या आरोग्याचा आणि आहाराचा आपल्या जन्म घेणाऱ्या मुलाच्या आरोग्यावर परिणाम होतो.