कृती :
साबुदाणा आधीच चार तास भिजवून ठेवा. मऊसर भिजवा. एका पसरट भांड्यात साबुदाणा, बटाटे, जिरेपुड, मिरची वाटण, मीठ घालून चांगले मळून मिश्रण एकजीव करा. शिंगाडा पिठात तिखट-मीठ घालून दाटसर (भज्यासाठी नेहमी भिजवतो तसे) भिजवून घ्या. कढईत तूप गरम करा. मळलेल्या गोळ्याचे लहान-लहान गोळे घेऊन कालवून ठेवलेल्या शिंगाडा पिठात बुडवा. गरम तुपात टाकून खरपूस तळा. उपवासाच्या चटणी बरोबर गरम असतानाच खा.