कृती-
मिक्स व्हेज पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात पीठ घ्यावे. तसेच थोडे मीठ आणि तेल घालून मिक्स करावे. यानंतर पाणी घालून मऊ पीठ मळून घ्यावे. आता पीठ 15 मिनिटे झाकून ठेवा. नंतर कढईत तेल गरम करून त्यात कांदा व हिरवी मिरची घालावी. तसेच आले घालून सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यावे. यानंतर त्यात वरील भाज्या घालून 2 मिनिटे परतून घ्यावे. आता नंतर वरील कोरडे मसाले आणि मीठ घालून मिक्स करावे. उकडलेले आणि मॅश केलेला बटाटा आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. यानंतर मळलेल्या पिठाचे छोटे-छोटे गोळे करून लाटून घ्या. नंतर तयार मिश्रण मधोमध भरून त्याची घडी करून पराठा लाटून घ्यावा. आता पराठा तव्यावर तेल लावून दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावा. तर चला तयार आहे आपला मिक्स व्हेजिटेबल पराठा, दही सोबत नक्कीच सर्व्ह करा.