पेपर डोसा

साहित्य: दीड कप साधे तांदूळ, दीड कप उकडे तांदूळ, 1 चमचा मेथ्या, 1 टेबलस्पून चण्याची डाळ, पाव कप गहू.
 
कृती: सर्व 3-4 तास भिजवून, बारीक वाटून घ्या. मीठ मिसळून 8 तास ठेवा. डोसे बनवा. 
 

नोट: तवा तापल्यावर थोडं पाणी शिंपडून व तवा गॅसवरून खाली काढून पीठ पसरा, म्हणजे डोसा पातळ बनेल. तवा फार गरम असल्यास पीठ शिजाला लागतं व झटपट पसरता येत नाही म्हणून प्रत्येक डोसा तयार केल्यानंतर पाणी शिंपडा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती