उपवासासाठी राजगिरा ड्रायफ्रुट्स लाडू हा एक अतिशय पौष्टिक, ऊर्जा देणारा आणि चविष्ट पर्याय आहे. हे लाडू बनवायला अतिशय सोपे असून दीर्घकाळ टिकतात. महाशिवरात्री किंवा एकादशीच्या उपवासाला झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी हे लाडू उत्तम आहे.
जायफळ पूड- चिमूटभर
कृती-
सर्वात आधी एका कढईत १ चमचा तूप गरम करा. त्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप हलके गुलाबी रंगावर परतून घ्या. यामुळे लाडूला छान कुरकुरीतपणा येतो. त्याच कढईत उरलेले १ चमचा तूप आणि चिरलेला गूळ घाला. मंद आचेवर गूळ वितळवून घ्या. गुळाला फेस येऊ लागला की एका वाटीत पाणी घेऊन पाकाचा थेंब त्यात टाका. जर पाण्याची गोळी तयार झाली, तर तुमचा पाक तयार आहे. गॅस बंद करा. आता या गरम पाकात राजगिरा लाह्या, परतलेले ड्रायफ्रुट्स, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून पटपट मिक्स करा. हाताला थोडे पाणी किंवा तूप लावून घ्या. मिश्रण कोमट असतानाच त्याचे छोटे छोटे लाडू वळून घ्या. मिश्रण थंड झाले तर लाडू वळता येणार नाहीत.
प्रमाण: जर गूळ कमी झाला तर लाडू सुटतील, त्यामुळे गुळाचे प्रमाण योग्य ठेवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.