Summer Special बनवा थंडगार आवळा ज्यूस

सोमवार, 21 एप्रिल 2025 (14:04 IST)
साहित्य-
चार -आवळे
१/४ -टीस्पून मीठ
काळी मिरी 
चाट मसाला
बर्फ 
ALSO READ: उन्हाळ्यात नक्की ट्राय करा थंडगार केशर लस्सी रेसिपी
कृती- 
सर्वात आधी आवळे स्वच्छ धुवून घ्यावे. आता त्यांचे लहान तुकडे करा. व बिया काढून टाका. यानंतर, काळी मिरी, चाट मसाला, एक ग्लास पाणी आणि आवळ्याचे तुकडे मिक्सरमध्ये टाका आणि ते बारीक वाटून घ्या. पेस्ट तयार झाल्यावर त्यात मीठ घाला आणि चाळणीतून चांगले गाळून घ्या. आता ते एका ग्लासमध्ये ओता व त्यामध्ये बर्फाचे तुकडे घाला. तर चला तयार आहे आपले आवळ्याचे ज्यूस रेसिपी, नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Summer special recipe थंडगार पुदिना ताक
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: उन्हाळा विशेष रेसिपी थंडगार Beetroot Buttermilk

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती