कृती-
सर्वात आधी एका जाड तळाच्या भांड्यात दूध घाला आणि ते मध्यम आचेवर उकळवा. दूध मंद आचेवर उकळवत राहा आणि ते अधूनमधून ढवळत राहा जेणेकरून ते तळाशी चिकटणार नाही. आता अर्धे दूध शिल्लक राहिल्यावर त्यात केशराचे धागे आणि वेलची पूड घाला. पिकलेले आंबे सोलून त्यांचा गर काढून मिक्सरमध्ये टाकून प्युरी बनवा. आता दूध घट्ट झाले की त्यात साखर घाला आणि २-३ मिनिटे उकळवा. आता गॅस बंद करा आणि दूध थंड होऊ द्या. दूध पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात आंब्याची प्युरी घाला आणि चांगले मिसळा. वरून चिरलेले सुके मेवे घाला. तयार आंब्याची रबडी साधारण तास रेफ्रिजरेटरमध्ये थंड करा. तर चला तयार आहे आपली मँगो रबडी रेसिपी, थंडगार नक्की सर्व्ह करा.