Summer Special Recipe खरबूज शेक

गुरूवार, 10 एप्रिल 2025 (08:00 IST)
साहित्य-
खरबूज- एक 
दूध- ३०० ग्रॅम
साखर- चार  टेबलस्पून 
वेलची- दोन  
बर्फाचे तुकडे
ALSO READ: उन्हाळा विशेष रेसिपी थंडगार Beetroot Buttermilk
कृती-
सर्वात आधी खरबूज स्वच्छ धुवून सोलून घ्या आणि नंतर त्याचे मोठे तुकडे करा. त्यानंतर, हे खरबूजाचे तुकडे, साखर आणि वेलची पूड मिक्सरमध्ये घाला आणि बारीक वाटून घ्या. आता या खरबुजाच्या मिश्रणात थंड दूध आणि बर्फाचे तुकडे घाला आणि परत एकदा मिक्सरमधून फिरवा. आता तयार शेक एका काचेच्या ग्लासमध्ये काढा.   तर चला तयार आहे आपली खरबूज शेक रेसिपी, थंडगार नक्कीच सर्वांना द्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: उन्हाळयात बनवा थंडगार रेसिपी Chocolate Ice Cream
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: Summer Special Instant Recipe खरबूजाचे शिकरण

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती