Bhaubeej 2023: भाऊबीजेच्या दिवशी काय करावे काय नाही

कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन केले जाते. या पूजेला 'यम द्वितीया' असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळवे यासाठी पूजा करते.
 
भाऊबीजेच्या दिवशी काय करावे?
सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल लावून स्नान करावे.
बहिणीने खालील मंत्र बोलून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.
 
भ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भव मिमं शुभं।प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषत:।।
 
तसेच भावाला गोड जेवण घालून त्याच्या कपाळावर टिळा लावावा.
त्यानंतर भावाने बहिणीच्या पाया पडून तिला भेटवस्तू द्यावी.
या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जेवण केले पाहिजे.
भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.
बहिणीला भेटवस्तू देवून तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करावी. नंतर तिच्या पाया पडून आशिर्वाद घ्यावा.
 
या दिवशी यमपूजा केली जाते.
यम पूजा करण्यासाठी मंत्र
 
धर्मराज नमस्तुभ्यं नमस्ते यमुनाग्रज।
पाहि मां किंकरै: सार्धं सूर्यपुत्र नमोऽस्तु ते।।
 
चित्रगुप्ताची पूजा करण्यासाठी खालील मंत्राचा उपयोग करावा
 
मसिभाजनसंयु ध्यायेत्तं च महाबलम्।
लेखनीपट्टिकाहस्तं चित्रगुप्तं नमाम्यहम्।।
 
काय टाळावे-
शास्त्रानुसार या दिवशी भावाने स्वत:च्या घरी भोजन केल्याने त्याला दोष लागतो. बहिणीच्या घरी जाणे शक्य नसल्यास एखाद्या नदीकाठी बसून किंवा गायीला बहीण समजून गायीजवळ बसून जेवण करणे योग्य ठरेल.
 
यमुना स्नान-
यम द्वितीयेला यमुना नदीत स्नान करणार्‍या बहीण आणि भावाला यमराजाची भिती नसते आणि त्यांना यमलोक बघावं लागत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती