Govardhan puja muhurt 2022 : गोवर्धन पूजा 2022 चे शुभ मुहूर्त

मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (09:40 IST)
Govardhan puja muhurt 2022: अमावस्या तिथी 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 04:18 पर्यंत राहील, त्यानंतर प्रतिपदा सुरू होईल जी 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:42 पर्यंत राहील. या मान्यतेनुसार गोवर्धन पूजा उदया तिथीला म्हणजेच 26 ऑक्टोबरला केली जाईल. दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक शुक्ल प्रतिपदेला गोवर्धन पूजा आणि अन्नकूट उत्सव साजरा केला जातो. चला जाणून घेऊया पूजेचा शुभ मुहूर्त.
 
दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवात दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. यावेळी 24 ऑक्टोबरला दिवाळीचा सण साजरा होणार असून, 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण आहे. तर 26 ऑक्टोबर रोजी गोवर्धन पूजा होणार आहे.
 
26 ऑक्टोबर 2022 रोजी गोवर्धन पूजेसाठी शुभ मुहूर्त :-
- गोवर्धन पूजेचा सकाळचा मुहूर्त: 06.28 ते 08.43.
- विजय मुहूर्त: दुपारी 02:18 ते 03:04 पर्यंत असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती