सर्वात आधी जरा तूप आणि कॉर्नफ्लॉवर एकजीव करुन बाजूला ठेवा.आता रवा-मैदा आणि चवीनुसार मीठ (नसेल घालायचे तरी हरकत नाही) एकत्र करुन त्यात 8 चमचे कडक तुपाचे मोयन घाला आणि चांगले मिसळून घ्या. नंतर दुध घालून (पाणी देखील वापरु शकता) चांगले घट्टसर मळून घ्या. 15-20 मिनिटांसाठी मिश्रण झाकून ठेवून द्या.
आता याचे मध्यम आकाराचे गोळे तयार करा.
सर्वप्रथम 3 गोळे घ्या त्याला मैदा लावून पातळ पोळी लाटा.
आता पोळपाटावर एक पोळी ठेवा त्यावर तुप-कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण पसरवून लावा मग त्यावर दुसरी पोळी ठेवा त्याला ही मिश्रण लावा आणि त्यावर तिसरी पोळी ठेवा त्यालाही मिश्रर लावा.
या पोळ्यांना बाजूनी रोल करा आणि एक घट्ट रोल बनवा.
त्यांना 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवा ज्यानेकरुन तूप घट्ट होतं.
नंतर चाकूने रोलचे लहान-लहान तुकडे करा.
या तुकड्यांच्या कडा दाबून घ्या आणि त्याला गरज असल्यास मैद्याचे पीठ लावा आणि हलक्या हाताने लाटून घ्या.
अशा प्रकारे सर्व चिरोटे लाटून घ्या.
गॅसवर आवडीप्रमाणे तेल किंवा तुपात हलका बदामी रंग येईपर्यंत तळून घ्या.
तळलेले चिरोटे गार झाल्यावर पिठी साखरेमध्ये बुडवून घ्या.
आता हे एअर टाइट कंटेनरमध्ये 10 दिवसतरी ठेवता येतात.
याच प्रमाणे पाकातेले चिरोटे करायची असतील तर साखरेऐवजी चिरोटे पाकमध्ये बुडवून काढले जातात.