"पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना फटका बसला. दुसऱ्या लाटेत तरुण आणि मध्यमवयीन लोकांना कोरोनाची लागण झाली. तिसऱ्या लाटेसंदर्भात अंदाज व्यक्त केला जात आहे. लहान मुलांना फटका बसेल असं म्हटलं जात आहे. आपण त्यासाठी तयारी करत आहोत," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
"माझे कुटुंब, माझी जबाबदारीची व्याप्ती वाढली आहे. घरीच कोणतंही औषध देऊ नये- डॉक्टरांचा सल्ला घ्या. लहान मुलांच्या पालकांनी घाबरु नये," असं मुख्यमंत्री म्हणाले.
"कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. माझी मुलं, माझी जबाबदारी असा विचार करायला हवा," असं मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनाची लागण मुलांना झाली तरी लक्षणं सौम्य असतात असा अभ्यास सांगतो.
लसीचा पुरवठा होत नसल्यानं 18-44 वयोगटातील लसीकरणाला ब्रेक दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.