मुंबईत गेल्या २४ तासात ७३३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६५० जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ६ लाख ८८ हजार ९९० जणांनी करोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहोचलं आहे. सध्या मुंबईत १४ हजार ८०९ करोना रुग्ण आहेत. मुंबईत रुग्ण दुप्पटीचा दर ७२६ दिवसांवर पोहोचला आहे. १३ जून ते १९ जूनपर्यंत करोना वाढीचा दर हा ०.०९ टक्के इतका होता. ठाण्यात १३,८८१ रुग्ण, पालघरमध्ये १,६०४ रुग्ण, पुण्यात १८, ०७५ रुग्ण, नाशिकमध्ये ४,६३६, नागपूरमध्ये ४,३५३, औरंगाबादमध्ये २,०५० करोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.