Maharashtra Corona Update: राज्यात 24 तासांत करोनाचे 3249 नवे रुग्ण आढळले

Webdunia
शनिवार, 2 जुलै 2022 (23:49 IST)
राज्यात जीवघेण्या करोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3249 रुग्ण आढळले आहेत.मुंबईत 978 प्रकरणे आढळून आली आहे. राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे चौघे जण मृत्युमुखी झाले आहेत. राज्यात 23996 सक्रिय रुग्ण आहे. 
 
सध्या देशात करोना संसर्गाचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या 24 तासांत करोनाचे 17 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत देशात कोव्हिडचे 17092नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख