राज्यात 4 हजार 205 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

शनिवार, 25 जून 2022 (09:01 IST)
काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात शुक्रवारी 4 हजार 205 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, 3,752 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोनामुक्तांपेक्षा बाधितांची संख्या अधिक नोंदवली जात होता. मात्र, मुंबईत नव्या 1,898 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, 2253 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 
 
राज्यात आज तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.85 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. तर, राज्यातील रूग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) 97.82 टक्के एवढा झाला आहे.
 
सध्या राज्यात 25 हजारांहून अधिक सक्रिय रूग्णांवर उपचार केले जात आहेत. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्तांपेक्षा बाधितांची संख्या अधिक होती. मात्र, मुंबईत बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे.
 
मुंबईतील रूग्ण बरे होण्याच्या दरामध्येदेखील वाढ नोंदवण्यात आली असून, येथे 97 टक्के रिकव्हरी रेट नोंदवला गेला आहे. मात्र, दुसरीकडे रुग्ण दुपटीचा दर वाढत असल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत रूग्ण वाढीचा दर 386 दिवसांवर पोहोचला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती