'इंदोर' देशातील सर्वाधिक वायरस संक्रमण होणाऱ्या शहरांच्या यादीत

शनिवार, 4 एप्रिल 2020 (08:46 IST)

राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत छोटी मुंबई म्हटल्या जाणाऱ्या इंदौर शहरात कोरोनाचे १४ रुग्ण आढळले आहेत. मध्य प्रदेशच्या इंदौर शहरात कोरोना वायरस बाधित रुग्णांची संख्या आता ८९ वर पोहोचली आहे. 

१४ कोरोना बाधित रुग्णांपैकी ३ महिला तर ११ पुरुष आहेत. या रुग्णांचे वय १९ ते ६० दरम्यानचे असल्याची माहिती शासकीय महात्मा गांधी स्मृति चिकित्सा महाविद्यालयाच्या अधिकाऱ्याने दिली. गेल्या नऊ दिवसांमध्ये कोरोना वायरसमुळे इंदौरमध्ये ५ रुग्णांचा मृत्यू झाला. 

इंदोर हे शहर देशातील सर्वाधिक वायरस संक्रमण होणाऱ्या शहरांच्या यादीत गेले आहे. यातून बचाव करण्यासाठी प्रशासनाने २४ मार्चपासून इंदौरच्या सीमेवर कर्फ्यू लावला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती