धक्कादायक : मुंबई विमानतळावर तैनात CISF चे 11 जवान कोरोना पॉझिटिव्ह

शनिवार, 4 एप्रिल 2020 (08:32 IST)
मुंबई विमानतळावर तैनात असलेल्या CISF च्या 11 जवानांना कोरोनाची (CISF Jawans Tested Corona Positive) लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. CISF नुसार, 142 जवानांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यापैकी काल 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, तर आज आखणी 7 जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता धाकधूक (CISF Jawans Tested Corona Positive) वाढली आहे.
 

11 CISF jawans posted at Mumbai airport tested #COVID19 positive. Total 142 were under quarantine since last few days. Out of which 4 were tested positive yesterday and others were tested positive today: CISF pic.twitter.com/EByO2I5Xae

— ANI (@ANI) April 3, 2020
 
देशातील आकडा वाढताच
तर देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात सध्या एकूण 2,301 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 336 नवीन केसेस समोर आले आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 56 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 157 जण हे बरे होऊन घरी गेले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती