महाराष्ट्रातील 81 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच नाहीत : राजेश टोपे

मंगळवार, 21 एप्रिल 2020 (07:52 IST)
महाराष्ट्रात आतापर्यंत 12 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली  केली (Corona symptoms) असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 81 टक्के कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. ते रुग्णालांमध्ये निवांत बसून आहेत. ते निवांत टीव्ही बघत आहेत आणि वृत्तपत्रे वाचत आहेत. लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या 17 टक्के आणि आयसीयूमध्ये असणाऱ्यांची संख्या 2 टक्के आहे. त्यामुळे घाबरुन जाऊ नका. काही लक्षणे आढळल्यास स्वत:हून टेस्टसाठी पुढे या, असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं (Corona symptoms).
 
राजेश टोपे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राज्यातील डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या प्रत्येकांचे आभार मानले. “राज्यात आजचा कोरोनाबाधितांचा आकडा 4,666 वर पोहोचला आहे. आज पुन्हा 350 ते 400 दरम्यान वाढ झाली आहे. परंतु डिस्चार्ज झालेल्यांची संख्यादेखील 572 आहे. आतापर्यंत 232 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे तिन्ही आकडे सांगणे गरजेचं आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.
 
“राज्य सरकार सर्व गोष्टी नियमानुसार, काटेकोरपणे आणि गाभिर्याने करत आहे. हे मला अत्यंत जबाबदारीनं सांगणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या टेस्ट झाल्या आहेत तेवढ्या देशामध्येही कुठे झालेल्या नसतील. महाराष्ट्रात 76 हजार टेस्ट झाल्या आहेत. यापैकी मुंबईत 50 हजारपेक्षाही जास्त टेस्ट झाल्या आहेत. यापैकी फक्त 2 टक्के लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे”, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती