Coronavirus : राज्यात काल ५५२ नवीन रुग्णांचे निदान; आरोग्यमंत्र्यांची माहिती

सोमवार, 20 एप्रिल 2020 (07:25 IST)
काल राज्यात कोरोनाबाधीत ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४२०० झाली आहे. १४२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३४७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज 552 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 4200 अशी झाली आहे. यापैकी 507 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक

— Rajesh Tope (@rajeshtope11) April 19, 2020
कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७२ हजार ०२३ नमुन्यांपैकी ६७ हजार ६७३ जणांचे नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ४२०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८७ हजार २५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६,७४३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात १२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ६ आणि मालेगाव येथील ४ तर १ मृत्यू सोलापूर मनपा आणि १ मृत्यू जामखेड अहमदनगर येथील आहे. त्यात ४ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६ रुग्ण आहेत. तर ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत व एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे.

मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या ४ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप अप्राप्त आहे. उर्वरित ८ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये ( ७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २२३ झाली आहे.

महाराष्ट्रातील जिल्हा व महापालिका निहाय कोरोना रुग्णांचा तपशील..#WarAgainstVirus#StayHome#CoronaUpdates#MaharashtraFightsCorona pic.twitter.com/OcpHayctHe

— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) April 19, 2020

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती