देशात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाचे १०८१ सक्रिय रुग्ण आढळले आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. केरळमध्ये कोरोनाचे ४३० सक्रिय रुग्ण आहे. तर राजस्थान, महाराष्ट्र यासारख्या राज्यांमध्येही कोरोना वेगाने पसरत आहे. महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोना विषाणूमुळे एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील या राज्यांमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण
आतापर्यंत देशभरात कोरोना विषाणू वेगाने पसरला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच, वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्याही वाढत आहे. दिल्लीत कोरोनाचे १०४ रुग्ण आढळले आहे, तर कर्नाटकात १००, गुजरातमध्ये ८३, राजस्थानमध्ये ३२ आणि उत्तर प्रदेशात कोरोनाचे ३० रुग्ण आढळले आहे. केरळमध्ये सर्वाधिक कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहे.
तसेच महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण २०८ सक्रिय रुग्ण आढळले. मंगळवारी, उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे उपचारादरम्यान एका ७८ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह वृद्धाचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटने ने कोरोनाच्या या प्रकाराचे वर्णन चिंताजनक म्हणून केलेले नाही. पण, लोकांना अजूनही खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.