त्यानुसार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात तेरा तालुक्यांमध्ये ५२ अधिकाऱ्यांना जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांमार्फत प्रशासनातील गाव पातळीवरील कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, संबंधित गावाचे सरपंच पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोना, म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी कोणती उपाययोजना करायची, गावामध्ये कसा कृती आराखडा तयार करायचा याबाबतचे मार्गदर्शन केले जात आहे. सर्व अधिकाऱ्यांना यासंदर्भात कार्यशाळा घेऊन प्रशिक्षित करण्यात आले असून जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या व्हिडिओद्वारे गावागावात मार्गदर्शन केले जात आहे.
आत्तापर्यंत देवळी, तारखेडा, चिंचोळी, पिंपळगाव मोगरा, अंबाडा, मानेगाव, पाटणसावंगी, वाकी, पुलर,आजनगाव,मेंढेपठार, मेटपांजरा, धापेवाडा, सावरगाव, मोहोगाव,सावंगी व्यवहारे, कोराडी, कामठी, अरोली, गोधनी, वाघोडा, कातेवाडा, बोखारा, बोरगाव,आदासा,सोनपूर, डोंगरगाव, लिंगा पार्डी,गोतमारे, ढवळापुर, गंगालडोह,लोणारा, चाकडोह, करांडला, कुही, पचखेडी,धानोली, गुमगाव,वाघधरा, वादोडा, पार्सद, तडाका, कोराडी, पिंडकेपार,बाबुलखेडा, लोनखैरी,बुधला, पथराई, दाहोद, लोहगड, सावरगाव, नागतरोली अड्याळ तास,भांडेवडी, बर्डेपार, अरोली, खापरी, घुमटी, कोहळा,मालेगाव,खडकी, महादुला, सातगाव, यासह शंभरावर गावांमध्ये हे अभियान राबविले जात आहे अशाप्रकारे प्रबोधनाचे व जनजागृतीचे अभियान राबविले जात असल्यामुळे आरोग्य यंत्रणेला गती प्राप्त होत आहे याशिवाय सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांचा यामध्ये गावपातळीवर समावेश करण्यात येत आहे. गाव पातळीवरील शंभर टक्के लसीकरण हे या मोहिमेचे अंतिम उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.