Chhatrapati Sambhaji Maharaj Marathi Quotes: छत्रपती संभाजी महाराज कोट्स
शुक्रवार, 10 मार्च 2023 (22:04 IST)
मृत्यू लाही मात देईल
असा त्यांचा गनिमी कावा,
झुकले नाही डोळे त्यांचे
असा माझा शिवबाचा छावा.
सिंहाच्या जबड्यात टाकूनी हात
मोजीन दात आशी हि मराठी जात,
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो
शृंगार होता संस्कारांचा,
अंगार होता हिंदवी स्वराज्याचा,
शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता आमच्या “छत्रपती शिवरायांचा”.
पराक्रमी योद्धा, एकही युद्ध न हरणारे स्वराज्य रक्षक,
ज्वलंत-कीर्तिमंत असे धर्मवीर शिवपुत्र,
शिवबाचा छावा व मराठा साम्राज्याचे
दुसरे छत्रपती संभाजी महाराज
रा = रांगडा वीर स्वराज्याचा
जे = जे केले तो इतिहास
सं = संस्काराचा धनी
भा = भारतीयांचा मानबिंदू
जी = जिंकले मृत्यूला
म = मर्द मराठा
हा = हाच एकमेव अजिंक्य योद्धा
रा = राजकुमार महाराष्ट्राचा
ज = जख्मातून ज्याच्या वाहिली शिवशाही
छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.
या भूमंडळाचे ठाई, स्वराज्य रक्षी ऐसा नाही।
स्वराज्य राहिले काही, तुम्हा करणी।।
शिवब्रम्ह मनी स्थिरावला।
गनिमांचा तेज ढळला।।
शंभूराजे अजय असा ठरला।
शिवरुपी राजा, शिवरुपी राजा, शिवरुपी राजा।।
जंगलात सिंहा समोर जाणारे भरपूर होते,
पण सिंहांचा जबडा फाडणारा एकच होता.
स्वराज्याचं धाकलं धनी शंभुराजे.
जेव्हा कधी वाटेल ना!
आयुष्यात खूप दुःख आहे,
एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा,
जाणीव होईल आपलं दुःख काहीच नाहीये!
कर्तृत्व एवढं महान असावं,
नुसता साज बघून स्वाभिमान जागा व्हावा,
!!धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज!!
संघर्षातल्या दुनियेतले
कधीही न आटणारे महासागर,
!! छत्रपती शिवशंभू !!
असे स्थान जिथे
जीवनात हरलेल्याला झुंजण्याची ताकत मिळते
ती म्हणजे माझ्या राजाच चंरण…!!
माती तुळापुरची झाली, पावन तुझ्या रक्ताने,
ते साखळदंड झालेत, धन्य तुझ्या स्पर्शाने,
पाहुनी शौर्य तुझ पुढे, मृत्युही नतमस्तक झाला
स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभूराजा अमर झाला.
छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मुजरा !!