तेजोमय शिवराज्याभिषेक सोहळा त्यबद्दल थोडा इतिहास व माहितीपर रिपोर्ट
पारतंत्र्याच्या अंधकारातून स्वराज्याच्या प्रकाशाकडे महाराष्ट्राला आणि देशाला घेवून जाणाऱ्या ऐतिहासिक आणि तेजोमय शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2024 या वर्षी 350 वर्षे पूर्ण होत आहेत अर्थात या वर्षी हा सोहळा 350 वर्षात पदार्पण करत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात येणारा शिवराज्याभिषेकाचा 350 वा वर्धापनकाळ राज्याचा सांस्कृतिक विभाग शिवराज्यभिषेक महोत्सव म्हणून साजरा करणार असून हा महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यादृष्टीने राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील मान्यवरांनी कल्पक सूचना कळवाव्यात असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
यासंदर्भात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी भावनिक आवाहन करणारे एक पत्र राज्यातील खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, महापौर, नगराध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी व इतर अधिकारी पदाधिकारी आदींना पाठविले आहे.
या पत्रात ना. मुनगंटीवार यांनी आर्त साद घालताना म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा पराक्रम,महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची दुर्दम्य आकांक्षा,महाराष्ट्राच्या शौर्याचे तेजस्वी प्रतिक आहेत.
बलाढ्य मोगल सत्तेशी युक्ती आणि बुद्धीने लढत महाराजांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण करीत स्वराज्याची स्थापना केली.हा सगळा संघर्षपूर्ण कालखंड म्हणजे महाराजांच्या अद्भुत प्रतिभेचा,दिव्यत्वाचा,अफाट सामर्थ्याचा साक्षात्कार होय.सर्वसामान्य मावळ्यांच्या बळावर आणि विश्वासावर झालेली ही वाटचाल म्हणजे भावी पिढ्यांसाठी कोरल्या गेलेली प्रेरणागाथाच होय.ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजे 6 जून 1674 या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला.केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर साऱ्या देशाच्या दृष्टीने ही एक असाधारण गोष्ट होती,एक सुवर्णक्षण होता .या क्षणाने मराठी माणसाच्या आयुष्यात नवीन पहाट उगवली,सामान्य माणसांच्या शक्तीने मदांध सतेला आव्हान दिल्या जावू शकते हा विश्वास महाराष्ट्रीयांच्या मनात रुजवल्या गेला,अनेक शतकांचे दास्य निखळून पडले आणि महाराष्ट्र धर्माची पुनःस्थापना झाली.या क्षणाने महाराज छत्रपती झाले,शिवराज्यभिषेक शकाचा प्रारंभ झाला,महाराजांच्या दिग्विजयाची आणि मराठा साम्राज्याची ख्याती सर्वत्र निनादू लागली.
सन 2023 -2024 या वर्षात शिवराज्याभिषेक शक 350 हा येत आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी चालू वर्षात 2 जून रोजी येत असून 2024 मध्ये ही तिथी 20 जून रोजी येत आहे. तेंव्हा दिनांक 2 जून 2023 पासून 20 जून 2024 या काळात शिवराज्यभिषेक महोत्सव साजरा करण्यात येईल.
राज्याभिषेकाचा दिवस महाराष्ट्रासह देशभर स्मरणात
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील महान राजांपैकी एक मानले जातात. त्यामुळेच त्यांच्या राज्याभिषेकाचा दिवस महाराष्ट्रासह देशभर स्मरणात आहे. महाराष्ट्रात त्यांचा राज्याभिषेक एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. त्याचबरोबर रायगडावरही दरवर्षी हा सोहळा विशेष थाटामाटात साजरा केला जातो. खरं तर, 348 वर्षांपूर्वी, 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. 1674 मध्ये त्यांनी मराठा साम्राज्याचा पाया घातला. रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांना छत्रपती ही पदवीही देण्यात आली होती. असे म्हणतात की, 4 ऑक्टोबर 1674 रोजी शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा छत्रपती ही पदवी धारण केली. दोन वेळा झालेल्या या सोहळ्यात सुमारे 50 लाख रुपये खर्च झाले. त्या काळासाठी ही मोठी गोष्ट होती.
महाराष्ट्रातील रायगड येथे दरवर्षी अखिल भारतीय राज्याभिषेक समितीतर्फे शिवराज्याभिषेक कार्यक्रम आयोजित केला जातो. 6 जून 1674 रोजी ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, छत्रपती शिवाजींचा हिंदू राज्याचा शासक म्हणून राज्याभिषेक झाला. मुघलांची साम्राज्यवादी स्वप्ने सत्यात उतरू नयेत म्हणून शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक केला.
परकीय शत्रूवर वचक आणि जरब बसवण्यासाठी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून घेणे गरजेचे होते म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेक झाल्यानंतर संपूर्ण जगात त्यांना छत्रपती ही पदवी मिळाली. भारतात खऱ्या अर्थाने शिवशाहीचा काळ सुरू झाला.
6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. भारतीय इतिहासात या घटनेकडे खूप महत्वाची घटना म्हणून पाहिले जाते. कारण त्या काळात संपूर्ण भारत परकिय आक्रमणांनी ग्रासला होता आणि एवढ्या मोठ्या शत्रूंना तोंड देऊन छत्रपतींनी आपला राज्याभिषेक केला होता. ही भारतीय इतिहासातील सामान्य गोष्ट नव्हती.
राज्याभिषेक करून राजा ही पदवी धारण करुन भारतातील परकीयांना शह देणे ही त्या काळात खुप धाडसाची कामगिरी छत्रपतींनी केली म्हणून भारतीय इतिहासात या घटनेकडे एक युगप्रवर्तक घटना म्हणून बघितले जाते. राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपतींनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. परकीय शत्रूंना शह देणारा छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितले जाऊ लागले.
शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती – shivrajyabhishek information in marathi
shivrajyabhishek sohala information in marathi – भारतातील सर्वात विद्वान पंडित म्हणून मिरविले गेलेले गागाभट्ट हे स्वतःहून छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती ऐकून त्यांची भेट घेण्यास आले होते आणि इथून पुढेच महाराजांच्या राज्याभिषेकाची खरी तयारी सुरू झाली.
वेळी महाराज सिंहासनारूढ झाले
गागाभट्टांनी राज्याभिषेकाची संपूर्ण जबाबदारी घेतली. त्या काळात गागाभट्ट काशीतील विद्वान पंडित होते. त्यांनी राजांच्या राज्याभिषेकाची संपूर्ण तयारी केली. गागाभट्ट हे काशीतील विद्वान पंडित होते राज्याभिषेकाचे संपूर्ण ज्ञान त्यांना होते. गागाभट्ट यांनी शिवराज्याभिषेकाचा साठी एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होणार राजा म्हणून राजाला बसण्यासाठी सिंहासन असावे लागते म्हणून छत्रपतींच्या राज्याभिषेकासाठी खास 32 मन सोन्याचे सिंहासन बनवून घेण्यात आले. शिवछत्रपतींना 32 मन सोन्याचे सिंहासन तयार करण्यात आले. राज्याभिषेक करणे हा एक धार्मिक विधीच आहे. राज्याभिषेक करण्यापूर्वी गागाभट्टांनी शिवराज्याभिषेकासाठी “तुला पुरुष दान विधी” व “राज्याभिषेक प्रयोग”हे दोन ग्रंथ तयार करून घेतले. राज्याभिषेक करण्यापूर्वी आवश्यक कार्य म्हणून छत्रपतींची मुंजा करण्यात आली.
राज्याभिषेक करण्यासाठी महाराजांची सुवर्णतुला करण्यात आली राज्याभिषेकासाठी सुवर्णतुला केली जाते त्यावेळी महाराजांचे वजन 160 पौंड होते. राज्याभिषेकासाठी महाराजांचे त्यांच्या पत्नींसोबत विधिवत विवाह करण्यात आले. राज्याभिषेक सोहळा नऊ दिवस चालला होता.
राज्याभिषेकाची सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर प्रत्यक्ष 6 जून 1674 हा दिवस उजाडला आणि भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा क्षण आला तो क्षण म्हणजे छत्रपतींचा राज्याभिषेक होय.
सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर गागाभट्टांनी या दिवशी छत्रपतींचा विधीवत असा राज्याभिषेक केला संपूर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात आहे की ऐतिहासिक क्षण निर्माण झाला.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1595 शनिवार दिनांक 6 जून 1674 रोजी सकाळच्या वेळी महाराज सिंहासनारूढ झाले. इतिहासातील एक ऐतिहासिक घटना कित्येक शतकांनी एक हिंदू राजा झाला कित्येक परकीय यांना तोंड देत राज्याभिषेक झाला इतिहासात सुवर्णाक्षरांनी हा क्षण लिहिला गेला.
कोणताही राजा राज गादीवर आल्यानंतर राज्यातील गोरगरीब गरजवंत या सर्वांना दानधर्म दक्षिणा दिली जाते तसेच दानधर्म दक्षिणा छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या वेळी देण्यात आली. शिवराज्याभिषेकाचा साठी भारत भर ब्राह्मणांना आमंत्रणे पाठवण्यात आली होती. रायगडावर कित्येक पाहुण्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती.
विदेशी व्यापारी, इंग्रज, परकीय शासक, प्रजा असे सारे लोक राजांच्या राज्याभिषेक वेळी उपस्थित होते. गागाभट्ट व इतर ब्राम्हणांना दक्षिणा म्हणून होन देण्यात आल्या. यावेळी सोळा प्रकारचे महादान करण्यात आले. गरजूंना यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे दान देण्यात आले. छत्रपतींच्या राज्य हे आदर्श राज्य होते राज्यातल्या प्रत्येक गरजवंताला मदत केली जात असे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा खऱ्या अर्थाने भारतातील परकीय सत्ताधीशांना त्यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी महाराजांनी राज्याभिषेक करवून घेतला होता. राज्याभिषेकाच्या निमित्ताने महाराजांची शक्ती सर्व परकीय सत्ताधीशांना दिसून आली महाराजांची दखल सर्व शत्रूंना घ्यावी लागली यातूनच महाराजांच्या शौर्याचे आणि महानतेचे दर्शन घडून येते.
Edited by : Ratnadeep Ranshoor