कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल गरम करा. नंतर मोहरी आणि जिरे घाला आणि त्यांना तडतडू द्या. आता कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घाला आणि हलके परतून घ्या. तसेच आता त्यात चिरलेले अननसाचे तुकडे घाला आणि मध्यम आचेवर ३-४ मिनिटे परतून घ्या. आता हळद, काश्मिरी तिखट, मीठ आणि गूळ घालून चांगले मिसळा. आता चिंचेचा कोळ घाला आणि मंद आचेवर पाच मिनिटे शिजू द्या, अननस मऊ झाल्यावर गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. नंतर ते मिक्सरमध्ये टाका आणि बारीक करा. तर तयार आहे आपली गोड आंबट अशी मसालेदार अननसाची चटणी रेसिपी पराठा, डोसा, इडली यांसोबत नक्कीच सर्व्ह करा.