योग्य करिअर कसे निवडावे ,करिअर टिप्स

रविवार, 13 जून 2021 (15:18 IST)
सध्या बारावी नंतर आणि महाविद्यालयीन शिकणाऱ्या मुलां समोर हा मोठा प्रश्न असतो.की आता पुढे काय करावे. कोणत्या क्षेत्रात करिअर करावे.
काहींना घरातील सदस्यांच्या सांगण्यावरून अनिच्छेने नावडता मार्ग निवडावा लागतो.तर काही मुलं कसलाही विचार न  करता समोर जो मार्ग दिसेल तो निवडतात. त्यामुळे मुलांचे नुकसान होते.आणि हाती निराशा येते.एक चुकीचा निर्णय आपल्या पुढील आयुष्याला धोक्यात आणू शकतो. असं होऊ नये.म्हणून करिअरची निवड करताना काही गोष्टींची काळजी घेणं देखील महत्वाचे आहे.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 स्वतःची आवड असणे आवश्यक आहे- कोणतेही करिअरची निवड करताना स्वतःची आवड त्या क्षेत्रात असणे आवश्यक आहे.आवडीचे क्षेत्रात करिअर केल्यास आपण त्यात चांगली कारकिर्दी दाखवू शकता.म्हणून नेहमी करिअरच्या क्षेत्राची निवड करताना आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करावी.
 
2 जाणकारांचा सल्ला घ्या-कधी कधी आपण अशा स्थितीत अडकून जातो जिथे आपल्याला पुढे काय करावं याचा मार्ग सापडत नाही. त्यासाठी आपण जाणकार किंवा अनुभवी लोकांचा सल्ला घेऊ शकतो.जेणे करून कामात काही चुका होणार नाही.आपण अनुभवी लोकांचा मौल्यवान सल्ला घ्या. जेणे करून आपल्याला काहीच त्रास होणार नाही. 
 
3 मित्रांपायी आपले भविष्य पणाला लावू नका-बऱ्याच वेळा असे होते की मित्र ज्या क्षेत्रात ची निवड करतात आपण देखील त्याच क्षेत्राची मित्रांच्या सांगण्यावरून  निवड करतो आणि त्यामुळे पुढील भविष्यामध्ये त्रास होतो.लक्षात ठेवा की प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते. जसे की कोणाला कॉम्प्युटरची आवड असते,तर कोणाला इंजिनियरिंग ची ,कोणाला डॉक्टर बनायचे तर, कोणाला व्यावसायिक.म्हणून करिअर करायचे आहे.आपण देखील आपली आवड जाणूनच  करिअर निवडा .मित्रांच्या सांगण्यावरून आपण आपली आवड बदलू नका.
 
4 स्वतःवर विश्वास ठेवा- काहीही करण्यापूर्वी स्वतःवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे.आपली स्वप्ना पूर्ण करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीला सामोरी जा. क्षेत्रात काहीही अडचण आल्यावर शांतपणे त्याच्यातून मार्ग काढा आणि पुढे वाढा.या साठी स्वतःवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे.
 
5 करिअरच्या भविष्याची माहिती मिळवा -आपण ज्या क्षेत्रात करिअर करायचे ठरवले आहे.त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती मिळवा. त्या क्षेत्रात आपल्याला पुढे जाऊन कितपत फायदा मिळणार किंवा भविष्यामध्ये त्यापासून काय फायदे मिळणार ही सर्व माहिती घेऊनच करिअरच्या क्षेत्राची निवड करा.अन्यथा आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती