Gautama Buddha प्रेरक कथा परिश्रम आणि धैर्य

सोमवार, 24 मे 2021 (11:42 IST)
एकदा भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह गावात उपदेश देण्यासाठी जात होते. त्यांना त्या गावाच्या वाटेवर जागोजागी खड्डे खणलेले दिसले. त्यांच्या एका शिष्याने त्या खड्ड्यांना बघून कोतुहलाने विचारले की, अखेर हे खड्डे खणण्याचा काय अर्थ आहे? 
बुद्ध म्हणाले, पाण्याच्या शोधात असणाऱ्याने एवढे खड्डे खणले आहे. जर त्याने धैर्य राखून एकाच ठिकाणी खड्डा खणला असता तर त्याला तिथेच पाणी मिळाले असते. त्याने खड्डा खणल्यावर पाणी मिळाले नाही तर दुसरीकडे खड्डा खणायला सुरुवात केली. 
माणसाने  कठोर परिश्रम करण्यासह धैर्य देखील ठेवले पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती