Gautama Buddha प्रेरक कथा : देणगीचे महत्त्व

शुक्रवार, 7 मे 2021 (18:32 IST)
भगवान बुद्धांचे पाटलीपुत्रात आगमन झाल्यावर प्रत्येक जण त्यांना आपल्या सामर्थ्याच्या परीने काही न काही भेट वस्तू देण्याची योजना आखू लागला. राजा बिंबिसार यांनी देखील त्यांना मौल्यवान हिरे, माणिक,रत्ने भेटस्वरूप दिली .भगवान बुद्ध यांनी ती भेट सहर्ष एका हाताने स्वीकारली. या नंतर सर्व मंत्री, सेठ ,सावकारांनी देखील आपल्या आपल्या भेटवस्तू त्यांना दिल्या भगवान बुद्धांनी त्या देखील सहर्ष एका हाताने स्वीकारल्या.  
एवढ्यात तिथे काठी टेकत एक म्हातारी बाई आली.ती भगवान बुद्धदेव यांना नमस्कार करत म्हणाली की,आपण येणार अशी बातमी मिळाल्यावर, मी हे डाळिंब खात होते. माझ्याकडे इतर कोणतीही भेट वस्तू नसल्याने मी हे अर्धवट खाललेले फळ आपणास घेऊन आले आहे. आपण माझ्या कडून ही लहानशी भेटवस्तू स्वीकारावी. आपण हे स्वीकार केलेस तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. भगवान बुद्धांनी ते फळ दोन्ही हात समोर करून स्वीकार केले.
राजा बिंबिसाराने हे बघितल्यावर त्यांना विचारले ,"भगवान क्षमा करावे परंतु मी आपणास एक प्रश्न विचारू इच्छित आहोत. आम्ही सर्वानी आपल्याला मौल्यवान भेटवस्तू दिला त्याचा आपण एका हाताने स्वीकार केला पण या म्हताऱ्या बाई ने आपले लहान आणि उष्टे फळ भेट म्हणून दिले ते आपण दोन्ही हाताने स्वीकारले असं का? '' 
हे ऐकून भगवान बुद्ध हसले आणि म्हणाले, 'राजन! आपण सर्वांनी अतिशय मौल्यवान भेट वस्तू दिल्या आहेत पण हे आपल्या संपत्तीचा दहावा भाग देखील नाही. आपण दिलेली ही देणगी घोर गरिबांच्या भल्यासाठी नाही म्हणून आपली ही देणगी 'सात्विक देणगी च्या श्रेणीत येणार नाही. या उलट या म्हाताऱ्या बाई ने आपल्या तोंडातील घास ही मला देणगी म्हणून दिले आहे. जरी ही म्हतारी गरीब आहे तरीही  तिला संपत्ती चा कसलाच  लोभ नाही. हेच कारण आहे की मी तिने दिलेली देणगी मोकळ्या मनाने ,दोन्ही हाताने स्वीकार केली.       
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती