एकदा भगवान बुद्ध भिक्षा मागण्यासाठी एका शेतकऱ्याकडे गेले. तथागत स्वतः भिक्षा मागण्यास आलेले असताना बघून तो त्यांना हिणवून म्हणाला, शेतात मी नांगरतो आणि मग खातो. आपल्याला देखील शेतात नांगरलेले पाहिजे आणि बियाणे पेरून मग खालले पाहिजे.
बुद्ध म्हणाले -महाराज ! माझ्या कडे श्रद्धेचे बियाणे, तपश्चर्या रुपी पाऊस,प्रजा स्वरूपात नांगर आहे. पापभयाचे दंड आहे. विचारांची दोरी आहे, स्मृती आणि जागरूकता स्वरूपी नांगराची पैनी आहे.