प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 18 मे 2024 (14:01 IST)
प्रसिद्ध अभिनेता' आणि 'त्रिनयानी' चे चंद्रकांत यांनी आत्महत्या केली आहे. फिल्म इंडट्रीमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. प्रसिद्ध तेलगू अभिनेता आणि  'त्रिनयानी' चे चंद्रकांत यांनी आत्महत्या केली आहे. एक्टर अलकापुर मध्ये मृत अवस्थेत आढळले आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत यांची पत्नी पवित्रा जयराम यांचा कार  अपघातात मृत्यू झाला होता. पत्नीच्या मृत्यू नंतर काही दिवसांनी चंद्रकांत यांनी आपले जीवन संपवले. अचानक केलेल्या आत्महत्येमुळे सर्वांना आश्चर्य वाटले आहे. पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे चंद्रकांत यांना दुःख सहन होत नव्हते. म्हणून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला आहे. 
 
12 मे ला अपघातात चंद्रकांत यांची पत्नी पवित्रा जयराम यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. तसेच पत्नी अचानक निघून गेल्यामुळे चंद्रकांत यांना दुःख सहन होत नव्हते. या दरम्यान ते देखील रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेत. त्यांना अशा अवस्थेत पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप दुःख झाले. आता चंद्रकांत यांनी स्वतःलाच संपवले. तसेच पत्नी गेल्यानंतर त्यांनी एक भावुक पोस्ट शेयर केली होती. 

संबंधित माहिती

पुढील लेख