सलमानचा मित्र सुनील ग्रोव्हर बघत नाही कपिल शर्माचा शो, अजून भांडण संपलं नाही

बुधवार, 15 मे 2019 (15:20 IST)
कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील भांडण आतापर्यंत चर्चेत आहे. प्रत्येकजण फक्त आशेने वाट बघत आहे की कधी लवकरात लवकर दोघं सोबत दिसतील. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान कपिल आणि सुनीलमधील गोंधळ संपवायचा प्रयत्न करत आहे. 
 
कपिल शर्माने देखील सार्वजनिक मंचांवर सुनील ग्रोव्हरकडून फक्त माफी मागितली नव्हे तर असेही सांगितले की सुनील आपल्या शोमध्ये परत यावा अशी ही इच्छा आहे. पण सुनील ग्रोव्हर कपिलबरोबर काम करण्यास तयार नाही. अलीकडेच एका मुलाखतीत सुनील ग्रोव्हरला विचारले की काय तो कपिल शर्माचा शो पाहतो? तर त्याने स्पष्ट नकार दिला. सुनील ग्रोव्हर म्हणाला की मी एखाद्या शोमध्ये नसलो तर मी तो शो बघत पण नाही. यानंतर तो म्हणाला की आजकाल शोमध्ये नवीन काहीच होत नाही. तेथे पुन्हा-पुन्हा जुना स्टाफच दर्शविला जातो. 
 
यावेळी कपिल शर्माचा शो सलमान प्रोड्यूस करत आहे. तर सलमानच्या आगामी चित्रपट 'भारत' मध्ये सुनील ग्रोव्हर त्याच्या मित्राची भूमिका बजावणार आहे. सलमान स्वत: या दोघांच्या मैत्रीची इच्छा ठेवतो. परंतु जुन्या गोष्टी विसरून सुनील कपिलसोबत काम करण्यास तयार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती