सानिया मिर्झाने कपिल शर्माला आपली भांडी परत करायला सांगितले

द कपिल शर्मा शोच्या हा आठवड्याच्या भागात प्रख्यात टेनिसपटू सानिया मिर्झा आपली बहीण अनाम मिर्झासोबत उपस्थित असणार आहे. सानिया आणि कपिल यांचे संबंध छान आहेत, त्यामुळे मोकळेपणाने सानिया त्याला म्हणाली की तो लग्नानंतर बदलला आहे.
 
हैदराबादेत जन्म होऊन तेथेच वाढलेली असल्याने सानिया मिर्झाचे हैदराबादी हिंदी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे पण तिच्या मते ही स्थानिक भाषा तिच्या बहिणीला अधिक चांगली येते. सानियाच्या मते हैदराबादचे लोक स्वभावाने आरामशीर असतात आणि काहीसे आळशीही असतात, त्यामुळे ते शब्द खाऊन त्या हिंदी शब्दांची लघु रुपे करतात, उदा. आयकु, जायकु, इ.
 
हैदराबादचा विषय आला की, तिथली बिर्याणी देखील आठवते, जी जगप्रसिद्ध आहे. कपिल पूर्वी कधी तरी हैदराबादला आलेला असताना सानियाने त्याला आणि त्याच्या टीमला बिर्याणीची मेजवानी दिली होती, ती आजवरची सर्वात स्वादिष्ट बिर्याणी होती अशी त्याची आठवण काढत कपिलने सानियाचे आभार मानले. त्यावर वेळ न घालवता सानिया म्हणाली, “तू अजून ती भांडी परत केलेली नाहीस आणि मला अजून त्याबद्दल विचारणा होते.”
कपिलने मग तो संपूर्ण प्रसंग आठवून म्हटले, “आम्ही हैदराबादला गेलो होतो आणि आम्हाला बिर्याणी खायची होती. सर्वात छान बिर्याणी कुठे मिळेल हे विचारण्यासाठी आम्ही सानियाला फोन केला होता. सानिया त्यावेळी दुबईत होती. पण तिने आम्हा सगळ्यांसाठी चविष्ट बिर्याणी पाठवली. तिने इतकी बिर्याणी पाठवली होती, की ती पाहून आम्ही चक्रावलोच. आम्ही प्रत्येक खोलीत बिर्याणी पाठवली आणि शेवटी असे झाले की, हॉटेलमधल्या प्रत्येक माणसाला, अगदी तेथील कर्मचार्‍याला देखील बिर्याणीचा वास येत होता. हे सगळे करण्यात काही भांडी गहाळ झाली. आम्ही विचार केला की आपण बिर्याणीचे बिल द्यावे पण त्या ऐवजी तो बिर्याणी आणणारा माणूस आपली भांडीच परत मागू लागला.”

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती