अपघात अशा ठिकाणी झाला जिथे मला कोणतीही मदत मिळत नव्हती.”“घरी जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गाडी टो करून मुंबईत आणणे. साधारण तासभर वाट पाहिल्यानंतर मदत पोहोचली. टो ड्रायव्हरनं सांगितलं की, आत बसा, गाडीला कधी मदतीची गरज भासली तर. माझी गाडी तर अक्षरशः श्वासही घेऊ शकत नव्हती! मग मी एसी नसलेल्या शांत गाडीत बसलो होतो. 6-7 तास महामार्गावरून ओढत नेलं जात होतं. रस्त्यावरचे लोक आत डोकावत होते, काहीजण हसत होते, तर काही अंदाज बांधत होते की नेमकं काय झालं असेल.”
या प्रवासादरम्यान तो रागावू शकला असता, चिडू शकला असता, पण त्यानं संयम ठेवला. “कधी कधी आयुष्य तुमच्यासमोर जी परिस्थिती आणतं, ती तशीच स्वीकारावी लागते. मी पुस्तक वाचलं, संगीत ऐकलं, थोडा झोपलो आणि या असामान्य प्रवासाचा आनंद घेतला,” दिवसभराचा अनुभव मोबाईलमध्ये टिपून एडिट करून मिनी व्लॉग बनवला प्रेक्षकांना आनंद घेण्यासाठी. असं सुयशनं सांगितलं.