Shahrukh Khan in Vaishno Devi शाहरुख खान पोहोचला माँ वैष्णोदेवीच्या दरबारात, व्हिडिओ झाला व्हायरल

Webdunia
सोमवार, 12 डिसेंबर 2022 (11:43 IST)
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटातील बेशरम रंग हे पहिले गाणे आज रिलीज होणार आहे. याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या गाण्यात शाहरुख आणि दीपिका पदुकोण दिसणार आहेत. गाण्याआधीच दोघांचा लूक समोर आला आहे. दरम्यान अभिनेता माँ वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी पोहोचला. अभिनेत्यासोबत त्याचे काही मित्रही दिसले. शाहरुख खानचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
 
आगामी वर्ष शाहरुख खानसाठी खास असणार आहे. त्याचा पठाण हा चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच नवीन वर्ष 2023 मध्ये जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. आज बेशरम रंग या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज होणार आहे. दरम्यान अभिनेता शाहरुख खानने रविवारी रात्री उशिरा वैष्णोदेवी येथे पोहोचून मातेचे दर्शन घेतले. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. त्याच्यासोबत त्याचे काही मित्रही दिसत आहेत.
 

संबंधित माहिती

पुढील लेख