सलमान, कतरिना, इमरान यांनी प्रेक्षकांना YRF च्या टायगर 3 मधील स्पॉयलर उघड न करण्याचे आवाहन केले!

Webdunia
शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (13:44 IST)
सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी प्रेक्षकांना YRF च्या टायगर 3 च्या कथानकामधील अगणित रहस्यांचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
 
सलमानने लिहिले की, “आम्ही #Tiger3 खूप उत्कटतेने बनवला आहे आणि जेव्हा तुम्ही चित्रपट पहाल तेव्हा आमच्या चित्रपटा मधिल स्पॉइलर च संरक्षण करण्यासाठी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवत आहोत. स्पॉयलर चित्रपट पाहण्याचा अनुभव खराब करू शकतात. जे योग्य आहे ते तुम्ही कराल यावर आमचा विश्वास आहे. आम्‍हाला आशा आहे की #Tiger3 ही आमच्‍याकडून तुम्‍हाला दिवाळीची परिपूर्ण भेट असेल!!”
 
 
 
आदित्य चोप्रा निर्मित, आणि मनीश शर्मा दिग्दर्शित, टायगर 3 या रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज होणार आहे.
 
एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर आणि पठान नंतरचा हा YRF स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे, जो भारतातील सर्वात मोठा चित्रपट आयपी आहे. YRF च्या स्पाई यूनिवर्स मधील सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

संबंधित माहिती

पुढील लेख